Sunday, September 4, 2016

योजकस्तत्र दुर्लभ :|



"मामी  नीता  के मामा का  पता  भेज  रहा  हु। परंतु  उसके  मामा   नीता   के  मामले  में  पड़ना  नहीं  चाहते" माझ्या  भाच्याचा   message  आला  होता , नीता  आमच्या  आश्रमातील  मुलगी ५ -६  वर्षाची  असल्यापासून  आमच्या  आश्रमात  राहते. वडील  लहानपणीच  वारले.  त्या   धक्क्याने  आईचे  मानसिक  संतुलन  बिघडले  ,तिची  रवानगी  mental  hospital  मध्ये  झाली  व  नीताची   आमच्या  आश्रमात जो  अ नाथ मुले  व  मुली साठी   आहे,मध्यंतरी  ,थोड़ी  मोठी  झाल्यावर  घरकामाला  मदत  होईल  म्हणून  नातलग   तिला   घरी  घेवून  गेले , परंतु  तिचा  तेथील  अनुभव  अत्यंत  दारुण  असा  होता ,त्याहीपेक्षा  घरातील  बुभुक्षित  नज़रांनी  घरातील  गृहिणीला  वेळीच  सावध  केले  व  तिची  रवानगी  पुन्हा  आश्रमात ,  मध्यंतरी  शाळा   सुटली ,तिला  मामाचे  नाव   व गांव  आठवत  होते , माझा  भाचा   त्याच  गावाचा  हे  समजल्यावर  मी  त्याला , नीताच्या  मामाचा  पत्ता  शोधायला  सांगितले  आणि  माझ्या  हरहुन्नरी  भाच्याने  तो  आज  पाठवला  होता  पण  सोबत  निरोप  सुद्धा , आता  उद्या ,माझ्या  मामाचा  पत्ता  मिळाला  का ? म्हणून  विचारणाऱ्या  नीताला  मी  काय  उत्तर  देवू ?मामा  येईल  ,आपल्याला  घेवून  जाईल , निदान  भेटायला  तरी  येईल  अशी  आशा  तिला  होती, त्या  निरागस  मुलीला " जगी  ज्यास   कोणी नाही  जगी  त्यास  देव्  आहे"    हे  तत्वज्ञान  तिला समजेल  का ? या १५- १६   वर्षाच्या  त्या  मुलीला  पचवणे  कठीणच  जाणार!  सुनीताहि  अशीच . सडपातळ बांधा ,लांब  केस , सावळा  वर्ण . पण चेहऱ्यावर बेफिकिरी , एक प्रकारचा  उर्मटपणा  --- तिला  इथून  सुटका  हवी  आहे .पण  जाणार कुठे ? तिला  कोणीच  नाही . ती इथेच  वाढली , मोठी  झाली . आता १२ वी , ला आहे ,तिला आता  बाहेरचे  जग  खुणावत  आहे .वर्गातील मुलाने  थोडी  सहानुभूती  दाखविली  असेल . आपुलकीला  हपापलेल्या  तिला त्याचेच  खूप  अप्रूप  वाटत .बाहेरचे  जग  तिने  सिनेमातच  बघितलेले  असते , ते  तिला  खरे वाटते 'प्यार  किया  तो डरना  क्या ' चा  फिल्मी आदर्श  समोर असतो .हे सार  क्षणिक  आहे हे त्यांना  समजत   नाही  आणि  मग  त्या  फसतात .तिची  समजूत  घालून ,आपल्या  पायावर  आधी  उभी  राहा  हे तिला पटवून  तिला  परावृत्त  जरी  केलं  असाल तरी  काही  सांगता येत  नाही या वयात  भावनांचा  वेग  इतका  जास्त असतो  कि तो  कोणत्याही  अडथळ्यांची  पर्वा  करीत  नाही .

 अश्या  नीता  , सुनीता  सारख्या  कितीतरी ललिता , ममता  , कविता  आमच्याकडे  आहे .प्रत्येकीची  कहाणी  थोड्याफार फरकाने  सारखीच  ,त्या  घरी  नको  असतात ,काहींना  आई  व  बाबा  असतात , काहींना  कोणीच  नसते . आइने   वा  बाबाने  दुसरे लग्न केले  असते आधीच्या मुलांची  अडचण होते  व मग  त्यांची  रवानगी  आश्रमात .काहींचा भूतकाळ भयंकर व लाजिरवाणा सुद्धा  असतो भाजलेल्या , चटके दिलेल्या ,नाजूक अवयवाना  इजा केलेल्या .नातलगांनी  वा  नराधम  बापानेच  वापरलेल्या . या सर्वच  मुली  निकृष्ट  सामाजिक  आर्थिक स्तरातील  असतात . त्या  लहान असतात  तोवर  त्यांना  सांभाळणे  सोपे  असते .पण वाढत्या  वयाच्या मुलींना  सांभाळणे  सोपे  नसते त्यांच्यापाशी  प्रचंड  ऊर्जा असते . बाहेरचे  जग  त्यांना खुणावत  असते .कितीही  निर्बंध  असले  तरी  त्या पळून  जातात पण  शेवटी  परत  येतात ..

अन्न , वस्त्र  व  निवारा  या माणसाच्या  मूलभूत  गरजा , त्या नीट पुरविल्या  जातात .साऱ्याच मुली निरोगी  आहेत ."बेटी  बचाओ , बेटी पढाओ " हा  आजचा नारा  आहे . यातील  पूर्वार्ध  आमच्या  हातात  आहे कितीही  कमी  वजनाचे  बाळ  असले  तरी  त्याची   सर्वोतोपरी  काळजी  घेऊन याला  निरोगी  आयुष्य  द्यायचा प्रयत्न  असतो . अनेक दानशूर व्यक्ती मदत करतात ."बेटी पढाओ" या  करीत मुलींना  शाळेत  पाठवतो --नव्हे  अनेक  शाळाच  आमच्याकडे  मुली  आमच्या शाळेत  पाठवा म्हणून विनंती करायला येतात .अनेक शाळांमध्ये , प्रवेश परीक्षा ,वशीला देणगी असे सारे प्रकार सुरु असताना  मराठी  माध्यमांच्या , अनुदानित  शाळा मात्र  ओस पडत  आहेत .कारण " शाळा  आहे  पण शिक्षण  नाही " अशी परिस्थिती  तेथे  आहे . १०वीच्या  मुलींना  किमान   वाचन ,लेखन पण येत नाही .कोरीकरकरीत  अशी मुले वरच्या वर्गात ढकलली  जातात . वाचलेलं समजत  नसेल . मनातील कागदावर उतरवता येत नसेल .तर रोज ११ते ५ शाळेत तोंडावर बोट व  हाताची घडी घालून बसणाऱ्या मुलांची मानसिकता कशी असू शकेल ? या आश्रमातील  मुली अश्याच  आहेत असं लेबल लावून शिक्षक मोकळे होतात. पाठ्यपुस्तकात  अनेक आशय संपन्न  कविता व धडे असतात जे मुलांच्या मनाला स्पर्श करू शकतात -पण मुलांना ते वाचता आले तर न !भाषेचा अभ्यास  वाचनाची गोडी लावू शकतो .पुढे  हीच पुस्तके आपला गुरु व मित्र बनून व्यक्तीला  मदत करतात मार्कांधिष्टित  शिक्षणप्रणालीत  याकडे लक्ष  दिले जात नाही या मुली  निकृष्ट  सामाजिक -आर्थिक  स्तरातून  आलेल्या  असतात हे  खरे  आहे . पण आता मात्र त्याउच्चसामाजिक-आर्थिक स्तर  असलेल्या  व्यक्तींनी  चालविलेल्या  संस्थेत राहत  आहेत .त्यांच्या  विकासाला  पोषक  असे  वातावरण  देता  आले  पाहिजे .तरच  आपण त्यांना आपण समाजाच्या  मूळ  प्रवाहात  सामील  करून  घेऊ शकू .अन्यथा त्यांच्या जीवनाला वेगळे वळण लागू शकते . आणि हे दुष्टचक्र  मग संपणारच नाही अन्न  , वस्त्र व निवारा याच्या पलीकडे जाऊन स्वाभिमान  व आत्मसन्मान   त्यांच्यात  विकसित व्हायला हवा .खेळ , संगीत  नाट्य  या सारख्या माध्यमांचा उपचार पध्द्ती म्हणून वापर  करून आधी त्यांच्या जखमा भरून काढून त्यांना  जगायला शिकवत येऊ शकते . परंतु  त्याकरता आस्था व कळकळ  असलेल्या लोकांची गरज  आहे . आर्थिक  मदत  करणारे  मिळतात पण निस्वार्थ  बुद्धीने काम करणारे उत्साही व कल्पक  कार्यकर्त्यांची  मात्र कमी आहे. या उमलत्या  कळ्या  कोमेजून जाऊ नये  असं खूप  वाटत .. कारण
                                              " जन्म असो  माळावरती  वा  उद्यानात
                                               प्रत्येक  कळीला  हक्क  आहे फूल  म्हणून  जगण्याचा ."

 गणेश  चतुर्थी
  ५ सप्टेंबर  शिक्षक दिन 

Monday, August 29, 2016

j

                                                 योजकस्तत्र  दुर्लभ: 
 मामी  , नीता के  मां  का  पता  भेज  रहा  हु। मगर  उसके  मां  उससे  कुछ  सम्बन्ध  रखना  नहीं  चाहते। मला  message  आला  होता।नीता  आमच्या  आश्रमातील  १५-१६  वर्षाची  मुलगी.वडील  वारले , आईला  पागल ठरवून

  
 

Tuesday, August 16, 2016


उद्धरावा स्वये आत्मा ....


    भारतीय  संस्कृतीने  स्त्रीला  जीवनव्यापी  गौणत्व  बहाल केले , त्याची मुळे आपल्या  परंपरेत  रुजलेली  आहेत .काही  मुली  आज  उंच  भरारी  मारून  खास  पुरुषी  असलेली  क्षेत्रे  काबीज  करून  समानता  सिद्ध  करत  आहेत  पण अश्या  मुली  बोटावर  मोजता  येतील  इतक्याच !एरवी , स्त्री  भृणहत्या , बलात्कार ,अत्याचार  या सारखे  स्त्रियांवरचे  अत्याचार  वाढतच  आहेत .आणि  "लडकी  बचाव " चा नारा  द्यावा  लागत  आहे .साधारण  स्त्रीला  अजूनही  माणूस म्हणून  जगण्याचा  अधिकार  नाही ."धर्म " या  संकल्पनेने व  त्याच्याशी  निगडीत  रूढी , परंपरेने  स्त्रीला  अपार   दु:ख  दिले .इंग्रजाच्या  आगमनानंतर  काही  तरुणांना  स्त्रियांच्या  गुलामगिरीची जाणीव  झाली व त्यांनी  सुधारणा  घडवून  आणल्यात . पण आश्चर्याची  गोष्ट  म्हणजे  त्या  काळात  गार्गी , मैत्रेयी , राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई या  सारख्या   तेजस्वी   स्त्रियांची  उदाहरणे  होती पण  स्त्रिया   अन्याया विरुध्द  पेटून  उठल्या  नाहीत .त्याग , सहनशीलता  याचे  महत्व  व समाजाचे  दडपण  हे त्याचे कारण .बंड करण्या पेक्षा सती  जाऊन  गौरवान्वित होणे  व  आत्महत्या  करणे  त्या  पसंत  करीत .शिवाय  बळी  जाणाऱ्यांची  मानसिकता  ,नेहमीच  इतरांनी  आपल्याला  मदत  करावी ,यातून  सुटका करावी  अशी  असते .व्रत वैकल्ये ,उपासतापास  करून  आपल्या  पदरात  हव  ते  दान  पडेल  असा त्यांचा  विश्वास.  भारतीय  संस्कृतीने  स्त्रीला  माणूस म्हणून  जगण्याचे  स्वातंत्र्य  नाकारले अनेक वर्षे  स्त्रियांनी  ते  स्वीकारले .
           २०व्या शतकाच्या  उत्तरार्धात व  २१  व्या  शतकाच्या  पूर्वार्धात  स्त्रियांनी  लिहिलेली  आत्मचरित्रे   वाचली
  असताना  जाणवते कि  हे  गौणत्व  त्यांच्या  रक्तात  भिनलेले  आहे त्याचा  घट्ट असा पीळ  त्यांच्या  मनात  तयार  झालेला  आहे  तो सैल  करावासा  वाटतो  पण  करता  येत  नाही .सरत्या  आयुष्यात , ते  जगायचेच  राहून  गेले  हि  बोचरी  खंत  मात्र  उरते .नवऱ्याला  मोठ   व्हायला  त्यांनी  मदत  केली  , प्रोत्साहन  दिले, त्याची  मर्जी  सांभाळली . हे  सारे  त्यांनी  मर्जीने  , करावस   वाटले  म्हणून  केले पण  आयुष्याच्या  उत्तरायणात आपला  भूतकाळ  पुन्हा एकदा वर्तमानात  आठवत  असताना तो  शब्दात  मांडत  असताना  त्यांची  खंत  मात्र  डोकावते---कदाचित  त्यांच्याही  नकळत .स्मृतिचित्रे  हे  लक्ष्मी बाई  टिळकांचे  मराठीतील  सर्वोत्कृष्ट  असे  आत्मचरित्र .१९३४ ते १९३७  या  कालखंडात  प्रसिध्द  झाले .त्यात  त्या  लिहितात " टिळक  पेटीत  गेले  व  माझे अस्तित्व  जागे  झाले "टिळकांचा  मृत्यू  १९१९  सालचा . त्यानंतर  त्यांनी  सर्व  आठवणी , अनुभव  लिहून काढले .ते हे  वाक्य  हृदय  पिळवटून  टाकणारे  तर  आहेच  त्याबरोबर  स्त्रियांची  होणारी  गळचेपी  विशद  करणारे  आहे .
   आजही  बाईची  माणूस  म्हणून   जगण्याची  धडपड  सुरूच   आहे ." मी  माणूस, माणूस  आधी , नाही  नुसती  नार"  हा  तिचा  आक्रोश   आहे . पण  आता  कोणाच्या  मदतीची  अपेक्षा  न  करता  स्वत: च  स्वत:च  उध्दार  केला  पाहिजे . उदध्वस्त  होऊन  मन  मारून  जगण्यापेक्षा  स्वत:ची  प्रगती  करीत  आनंदाने  जगले  पाहिजे आपण  जाळून  इतरांना  सुवास  देणाऱ्या  उदबत्तीची  उपमा  आता  जुनी  झाली . त्यापेक्षा  फुलाप्रमाणे  स्वत:  विकसित  होत  इतरानाही  आनंदित  करत  का  नाही  जगायचे ?त्या  करिता   आक्रमक  नव्हे  तर आपल्या  रास्त  इच्छा , मते  व  आवडीच्या  बाबतीत  आग्रही  का  नाही  राहायचे ?आपल्या  भावनाची  जोपासना  करणे  हि  प्रत्येकाचीच  गरज  आहे   त्या  मारून  टाकायला  नकोत .आयुष्य  समृध्द   व्हायला  त्यामुळे  मदत  होते .आपले  हित  जपणे  व आवडींचा  विचार  करणे  म्हणजे  स्वार्थ  वा  अप्पलपोटेपणा  नाही .फक्त  हे  करीत  असताना  इतरांवर  अन्याय  व्हायला  नको .आपला  आनंद  इतरांच्या  दु:खाचे  कारण व्हायला  नको .स्वहित  जपावे  पण परहित  जाणावे .सतत  भीती , अपमान , नकार , दडपण  यांना  सामोरे  जाव  लागत  असेल  तर  उदासीनता  , दु:ख , राग , मत्सर  या  सारख्या  रोगट  व  नकारात्मक  भावनांना  व्यक्ती  बळी  पडते ,मग  घराचे  रणांगण  होते  नाहीतर  घरे  मुकी होतात . दोन्ही  परिणाम  घराचे  व त्यातील  व्यक्तींचे   स्वास्थ्य  बिघडवतात .सुखी  व समृध्द  जीवना करिता  भावनाची  जोपासना व  मशागत  महत्वाची  आहे  समतेचा  व  मानवतेचा  पुरस्कार  करण्याचे  काम शेवटी  कुटुंबाचेच  आहे त्याकरिता  सुजाण  व  डोळस  पालकत्वाची  चळवळ ---पण  ती  फक्त  आईवडिलापुरतीच  मर्यदित   न  राहता --मुलामुलींच्या  संस्कारक्षम  वयाला   आकार  देणाऱ्या    समाजाच्या   प्रत्येक  घटकाकरिता  असायला  हवी .                                                   
           आपले  सुख  व समाधान  हे  पराश्रयी असूच  शकत  नाही .ते  बाजारातही  मिळत  नाही . आपल्या  सुखाच्या  जागा  आपल्याला  प्रयत्नपूर्वक  शोधाव्या , नव्हे  त्या  निर्माण  कराव्या  लागतात 
कवी  बोरकर  म्हणतात  "देखणी  जी  जीवने|  जी  तृप्तीची  तीर्थोदके |
                                         चांदणे   ज्यातून  वाहे | शुभ्र  पाऱ्यासारखे |



                       इंग्रजी   भाषांतर   मला  सापडले 
                                       Life is beauteous,
                                      Which is pilgrimage of  contentment 
                                       From which flows the moon beam
                                       Like pure  mercury .



                                       
                                      

Sunday, July 31, 2016

बुद्धी दे रघुनायाका


                                                   बुद्धी   दे  रघुनायका 


आता  वाढत्या  वयात  Happy Birth Day  हे  शब्द  ऐकले  कि  "आयुष्याची  झाली  रात  ,मनीi तेवे  अंतर्ज्योत"  या  दुर्गाबाई च्या   ओळी  माझ्या  मनात  पिंगा  घालू   लागतात .या  दिवशी  मी  माझ्या  मनात  आयुष्याचा   लेखाजोखा  मांडते _-आतापर्यंत  जमा  केलेले  संचित  व  केलेल्या चुका  सुध्दा !माणूस  हा स्खलनशील  प्राणी  आहे ,तो  चुका  करतो  व त्यातून  प्रयत्न -प्रमादानेच  शिकतो .खर  तर  चुका  स्वीकारणे  व त्या  सुधारणे  यातच  प्रगतीचे  बीज  रोवलेले  असते .पण  आपल्याला  आपल्या  चुका  पटकन  दिसत  नाहीत  इतरांच्या  मात्र  दिसतात  व त्या लगेच   सुधरण्याचा  आपण प्रयत्न  करतो --स्वतः कडे  न्यायाधीशाची  भूमिका  घेवून !खर तर  इतरांना  सुधरता   येतच  नाही .आपण  बदलल  कि  जग  बदलत  हेच  खरे  आहे .मला  अजूनही  शेवटचा  दिवस गोड  व्हावा  म्हणून  बदलावस  वाटत  म्हणून  हा प्रयत्न.आपल्याच  समाधानाकरिता .

  जीवनात  जेव्हाजेव्हा  माझ्याकडून  चुका झाल्यात  व अपयश  आले तेव्हा  मी    नशिबाला  दोष  देवून  स्वतःची  सुटका  करून  घेतली . पण  आज  मात्र  वाटत  नशीब  वगेरे  काही  खरच  असत  का ? जीवनातील  सर्वच  घटना    आपण   घेतलेल्या  योग्य  व अयोग्य  निर्णयांचाच  परिणाम  असतात  किंवा  probabilityच्या  नियम प्रमाणे  घडत  असाव्यात .पण  योग्य  निर्णय  घ्यायला  शहाणपण   लागत  व हे शहाणपण  आत्मभानातून  येत  हे  आज  अनेक  भावनिक  वादळे अनुभवल्यानंतर  माझ्या  लक्ष्यात  येत  आहे हे   शहाणपण  म्हणजे आपल्या  मर्यादांची ,उणिवांची  व त्याचबरोबर  आपल्या सामर्थ्यांची  जाणीव असणे   ज्या गोष्टी आपल्याला  अशक्य  वाटतात  त्यांचा  नाद  सोडायचा परंतु  ज्या शक्य  आहेत  त्या कठीण  वाटल्या  तरी  त्यांचा  पाठपुरावा  करायचाच .परंतु  यातही  एक मेख  आहे .wisdom to know the  difference काय  शक्य आहे  व  काय  अशक्य  आहे हे  माझे  मला  कळण्यासाठी   बुद्धी दे  रघूनायका .
शहाणपणात आपल्या  दृष्टिकोनाचा  वाटा  सुध्दा  खूप  महत्वाचा  असतो .दृष्टी  हि  दैवी   देणगी  आहे  पण दृष्टीकोन हा  संस्काराचा .भावनांच्या  मशागतीचा  भाग  आहे हेलन केलरला  दृष्टी  नव्हती  नव्हती  परंतु  तिने  विकसित  केलेल्या  सकारात्मक  दृष्टीकोनाने   तिने  पंगुं लंघयते  गिरिम  हि  उक्ती  सार्थ  केली . हा  दृष्टीकोन  गुणसूत्रामुळे  मिळ्त  नाही  तर तो विकसित  होतो  व करावा  लागतो .त्याच्या  मागे  आपले  विचार  असतात सकारात्मक  विचार  सकारात्मक  दृष्टीकोन  तयार  करतात .परंतु  आपल्या विचारांवर  भवनाचा  पगडा  असतो .कितीही  विचारपूर्वक  निर्णय  घ्यायचा  म्हटलं  तरी  शेवटी  या  भावनाच  बाजी  मारतात .भावना या आपल्या जीवनाचा महत्वाचा  भाग  आहेत .त्याच  जीवनात  रंग  भरतात .फक्त  या  भावनांना  विचाराचे  अधिष्ठान  हवे त्यांनी  आपल्यावर  स्वार  व्हायला नको आजही  संतापाच्या  भरात  लोक भयंकर  गुन्हे  करतात व क्षुल्लक  अपयशाने  आत्महत्या सुध्दा ! खरा तर  हे  भावनाचे व्यवस्थापन  महत्वाचे  आहे पण  आपण अनेकदा  या  भावनांच्या  सापळ्यात  अडकले  असतो  व  उदास  असतो .आपले  निर्णय मग  चुकतात त्याकरिता  बुद्धीने  ,विवेकाने  निर्णय  घेता  आले  पाहिजेत ,