थकले पाउल सहज पडावे
आणि सर्व प्रवास सारा
अस मनोमन वाटत असले तरी ते बोलणे म्हणजे निराशेचा उद्गार वाटतो . प्रवास संपायची भीती वाटते वास्तविक हे तर अंतिम सत्य आहे मृत्यू हा जीवनाचा एक अभिन्न असा भाग आहे पण अभद्र असा नाही कोणत्याहि तत्वद्यानात त्याला वाईट ,evilम्हटलेले नाही .पण आपल्याला मात्र मरणाचा उच्चार वा विचार हि केलेला आवडत नाही "अगा , मर हा शब्द न साहती | आणि मेलिया तरी रडती " असे द्यानेश्वर सांगतात .मरणा इतके वास्तव सत्य दुसरे नाही .जन्माला आला तो मरणारच , ते अजून तरी कोणाला चुकवता आले नाही .आयुष्याचे एक टोक हे मरणाकडे गेलेले आहे हे लक्ष्यात ठेवून शेवटचा क्षण पुण्यमय ,पवित्र व गोड कसा होईल याचा विचार उत्तरायणात मनात आला तर त्यात अशुभ अस काहीच नाही.मृत्यूला "माहेर" असेही म्ह टले आहे . म्हणजे जेथून आलो तेथे परत जाणे आपल निरागस बालपण माहेरी ठेवून ती या संसारात आली ती पुन्हा ते अनुभवणार याचा तर आनंद वाटायला हवा .
संधि प्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो द्यावी त्यांना
संध्याकाळ झाली आहे सूर्य परतीला निघाला असताना सुध्दा आपल्या सोनेरी किरणांनी सारा आसमंत उजळून टाकतो .आकाश्यात सोने पसरल्याचा भास होतो अशा वेळी डोळे मिटावेत जीवनात आनंद भरलेला आहे ,मन शांत ,तृ प्त आहे , जे जे हव ते ते सर्व ता मिळाले अशावेळी समाधानाने निरोप घेण्यात केवढा आनंद !वाट बघत बघण्यापेक्षा तो क्षण पटकन यावा व संपावा. सूर्यासारखे तेजस्वी सारे नसतात . सारा आसमंत उजळून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्य्पाशी नसेलही पण त्यांच्या परीवारापुरते तरी असतेच न!मृत्यूकडे उत्सवासारखे बघता आले पाहिजे
अनेकांचे जगण सामान्यच असत .प्रत्येकजण काही प्रतिभावंत नसतो तरीही तो आपले आयुष्य उजळून टाकतो आणि कृतार्थ होवून परतीची वाट पकडतो . मार्गस्थ होतो "आयुष्याची झाली उजवण येतो तो क्षण अमृताचा " अस म्हणण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे