Sunday, September 4, 2016

योजकस्तत्र दुर्लभ :|



"मामी  नीता  के मामा का  पता  भेज  रहा  हु। परंतु  उसके  मामा   नीता   के  मामले  में  पड़ना  नहीं  चाहते" माझ्या  भाच्याचा   message  आला  होता , नीता  आमच्या  आश्रमातील  मुलगी ५ -६  वर्षाची  असल्यापासून  आमच्या  आश्रमात  राहते. वडील  लहानपणीच  वारले.  त्या   धक्क्याने  आईचे  मानसिक  संतुलन  बिघडले  ,तिची  रवानगी  mental  hospital  मध्ये  झाली  व  नीताची   आमच्या  आश्रमात जो  अ नाथ मुले  व  मुली साठी   आहे,मध्यंतरी  ,थोड़ी  मोठी  झाल्यावर  घरकामाला  मदत  होईल  म्हणून  नातलग   तिला   घरी  घेवून  गेले , परंतु  तिचा  तेथील  अनुभव  अत्यंत  दारुण  असा  होता ,त्याहीपेक्षा  घरातील  बुभुक्षित  नज़रांनी  घरातील  गृहिणीला  वेळीच  सावध  केले  व  तिची  रवानगी  पुन्हा  आश्रमात ,  मध्यंतरी  शाळा   सुटली ,तिला  मामाचे  नाव   व गांव  आठवत  होते , माझा  भाचा   त्याच  गावाचा  हे  समजल्यावर  मी  त्याला , नीताच्या  मामाचा  पत्ता  शोधायला  सांगितले  आणि  माझ्या  हरहुन्नरी  भाच्याने  तो  आज  पाठवला  होता  पण  सोबत  निरोप  सुद्धा , आता  उद्या ,माझ्या  मामाचा  पत्ता  मिळाला  का ? म्हणून  विचारणाऱ्या  नीताला  मी  काय  उत्तर  देवू ?मामा  येईल  ,आपल्याला  घेवून  जाईल , निदान  भेटायला  तरी  येईल  अशी  आशा  तिला  होती, त्या  निरागस  मुलीला " जगी  ज्यास   कोणी नाही  जगी  त्यास  देव्  आहे"    हे  तत्वज्ञान  तिला समजेल  का ? या १५- १६   वर्षाच्या  त्या  मुलीला  पचवणे  कठीणच  जाणार!  सुनीताहि  अशीच . सडपातळ बांधा ,लांब  केस , सावळा  वर्ण . पण चेहऱ्यावर बेफिकिरी , एक प्रकारचा  उर्मटपणा  --- तिला  इथून  सुटका  हवी  आहे .पण  जाणार कुठे ? तिला  कोणीच  नाही . ती इथेच  वाढली , मोठी  झाली . आता १२ वी , ला आहे ,तिला आता  बाहेरचे  जग  खुणावत  आहे .वर्गातील मुलाने  थोडी  सहानुभूती  दाखविली  असेल . आपुलकीला  हपापलेल्या  तिला त्याचेच  खूप  अप्रूप  वाटत .बाहेरचे  जग  तिने  सिनेमातच  बघितलेले  असते , ते  तिला  खरे वाटते 'प्यार  किया  तो डरना  क्या ' चा  फिल्मी आदर्श  समोर असतो .हे सार  क्षणिक  आहे हे त्यांना  समजत   नाही  आणि  मग  त्या  फसतात .तिची  समजूत  घालून ,आपल्या  पायावर  आधी  उभी  राहा  हे तिला पटवून  तिला  परावृत्त  जरी  केलं  असाल तरी  काही  सांगता येत  नाही या वयात  भावनांचा  वेग  इतका  जास्त असतो  कि तो  कोणत्याही  अडथळ्यांची  पर्वा  करीत  नाही .

 अश्या  नीता  , सुनीता  सारख्या  कितीतरी ललिता , ममता  , कविता  आमच्याकडे  आहे .प्रत्येकीची  कहाणी  थोड्याफार फरकाने  सारखीच  ,त्या  घरी  नको  असतात ,काहींना  आई  व  बाबा  असतात , काहींना  कोणीच  नसते . आइने   वा  बाबाने  दुसरे लग्न केले  असते आधीच्या मुलांची  अडचण होते  व मग  त्यांची  रवानगी  आश्रमात .काहींचा भूतकाळ भयंकर व लाजिरवाणा सुद्धा  असतो भाजलेल्या , चटके दिलेल्या ,नाजूक अवयवाना  इजा केलेल्या .नातलगांनी  वा  नराधम  बापानेच  वापरलेल्या . या सर्वच  मुली  निकृष्ट  सामाजिक  आर्थिक स्तरातील  असतात . त्या  लहान असतात  तोवर  त्यांना  सांभाळणे  सोपे  असते .पण वाढत्या  वयाच्या मुलींना  सांभाळणे  सोपे  नसते त्यांच्यापाशी  प्रचंड  ऊर्जा असते . बाहेरचे  जग  त्यांना खुणावत  असते .कितीही  निर्बंध  असले  तरी  त्या पळून  जातात पण  शेवटी  परत  येतात ..

अन्न , वस्त्र  व  निवारा  या माणसाच्या  मूलभूत  गरजा , त्या नीट पुरविल्या  जातात .साऱ्याच मुली निरोगी  आहेत ."बेटी  बचाओ , बेटी पढाओ " हा  आजचा नारा  आहे . यातील  पूर्वार्ध  आमच्या  हातात  आहे कितीही  कमी  वजनाचे  बाळ  असले  तरी  त्याची   सर्वोतोपरी  काळजी  घेऊन याला  निरोगी  आयुष्य  द्यायचा प्रयत्न  असतो . अनेक दानशूर व्यक्ती मदत करतात ."बेटी पढाओ" या  करीत मुलींना  शाळेत  पाठवतो --नव्हे  अनेक  शाळाच  आमच्याकडे  मुली  आमच्या शाळेत  पाठवा म्हणून विनंती करायला येतात .अनेक शाळांमध्ये , प्रवेश परीक्षा ,वशीला देणगी असे सारे प्रकार सुरु असताना  मराठी  माध्यमांच्या , अनुदानित  शाळा मात्र  ओस पडत  आहेत .कारण " शाळा  आहे  पण शिक्षण  नाही " अशी परिस्थिती  तेथे  आहे . १०वीच्या  मुलींना  किमान   वाचन ,लेखन पण येत नाही .कोरीकरकरीत  अशी मुले वरच्या वर्गात ढकलली  जातात . वाचलेलं समजत  नसेल . मनातील कागदावर उतरवता येत नसेल .तर रोज ११ते ५ शाळेत तोंडावर बोट व  हाताची घडी घालून बसणाऱ्या मुलांची मानसिकता कशी असू शकेल ? या आश्रमातील  मुली अश्याच  आहेत असं लेबल लावून शिक्षक मोकळे होतात. पाठ्यपुस्तकात  अनेक आशय संपन्न  कविता व धडे असतात जे मुलांच्या मनाला स्पर्श करू शकतात -पण मुलांना ते वाचता आले तर न !भाषेचा अभ्यास  वाचनाची गोडी लावू शकतो .पुढे  हीच पुस्तके आपला गुरु व मित्र बनून व्यक्तीला  मदत करतात मार्कांधिष्टित  शिक्षणप्रणालीत  याकडे लक्ष  दिले जात नाही या मुली  निकृष्ट  सामाजिक -आर्थिक  स्तरातून  आलेल्या  असतात हे  खरे  आहे . पण आता मात्र त्याउच्चसामाजिक-आर्थिक स्तर  असलेल्या  व्यक्तींनी  चालविलेल्या  संस्थेत राहत  आहेत .त्यांच्या  विकासाला  पोषक  असे  वातावरण  देता  आले  पाहिजे .तरच  आपण त्यांना आपण समाजाच्या  मूळ  प्रवाहात  सामील  करून  घेऊ शकू .अन्यथा त्यांच्या जीवनाला वेगळे वळण लागू शकते . आणि हे दुष्टचक्र  मग संपणारच नाही अन्न  , वस्त्र व निवारा याच्या पलीकडे जाऊन स्वाभिमान  व आत्मसन्मान   त्यांच्यात  विकसित व्हायला हवा .खेळ , संगीत  नाट्य  या सारख्या माध्यमांचा उपचार पध्द्ती म्हणून वापर  करून आधी त्यांच्या जखमा भरून काढून त्यांना  जगायला शिकवत येऊ शकते . परंतु  त्याकरता आस्था व कळकळ  असलेल्या लोकांची गरज  आहे . आर्थिक  मदत  करणारे  मिळतात पण निस्वार्थ  बुद्धीने काम करणारे उत्साही व कल्पक  कार्यकर्त्यांची  मात्र कमी आहे. या उमलत्या  कळ्या  कोमेजून जाऊ नये  असं खूप  वाटत .. कारण
                                              " जन्म असो  माळावरती  वा  उद्यानात
                                               प्रत्येक  कळीला  हक्क  आहे फूल  म्हणून  जगण्याचा ."

 गणेश  चतुर्थी
  ५ सप्टेंबर  शिक्षक दिन 

1 comment:

  1. Very true ! Well written !! प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा ."

    ReplyDelete